इतिहास


मुळ नांव– उचगांव, १८ व्या शतकात या गावाचे अस्तित्व सद्या उत्तरेला असलेल्या पंचगंगा नदीच्या तीरावर काही तुरळक घराणी बनलेल्या एका छोट्या वस्तीच्या रुपात होते. श्री ब्रम्हानाथ मंदिर, श्री मारुती मंदिर, श्री नरसिंह मंदिर व जुनी गावचावडी परिसरात वसलेले होते. नदीच्या काठावर वसलेल्या या छोट्या वस्तीला पुरचा त्रास जानउ लागला तेव्हा या वस्तीला पर्याई जागा मिळावी म्हणून गाव मानकरी व प्रतिष्टियानी करवीरचे राजेंच्याकडे मागणी केली. सध्या गाव अस्तित्वात आहे ती उन्चावरिल जागा मागितली व ती मिळाली. राजेंच्याकडे गावातील लोकानी आपल्या गावाला नाव देने विषयी विनंती केली असता राज्यानि सहज उदगार काढले की, आता तुम्ही उंचावर रहनारे लोक म्हणजे तुम्हाला आता उंचगावकर म्हटले पाहिजे. आज पासून तुमच्या गावाचे नाव उंचगाव. तेव्हा पासून गावाला उंचगाव हे नाव रूढ़ झाले. छोट्या वस्तीचे श्रधास्थान म्हणून त्यावेळी मंगेश्वर मंदिराची स्थापना राजेंच्या सेवेतील श्री जगदगुरु महाराज यांच्या वतनात झाली. त्यास खडीचा मंगोबा असे म्हटले जाते. १९१९ साली मंगेश्वर देवाची प्रतिष्ठापना नविन गावामधे करण्यात आली. १९४० पर्यंत मंदिराचे स्वरुप सादे होते त्यानंतर मंदिराचा जीर्णोधार होत गेला. श्री मंगेश्वर देवाची त्रेवार्षिक यात्रा च्येत्रशुध्य एकादशीला सुरुवात होते. यात्रा 5 दिवस चालते. गावच्या ग्रामपंचायतिची स्थापना १९४३ साली झाली. गावाचे प्रथम सरपंच म्हणून कै. मारुती हरी पाटिल यानि सन १९५५ पर्यंत कामकाज पाहिले. ग्रामपंचायत बांधकामासाठी कै. तात्यासाहेब मल्हारराव सरनोबत सरकार यानि स्व मालकीची १ एकर जागा विनामूल्य दिली. कै. रामचंद्र बलवंत घोरपडे, कै. शंकरराव मारुती पाटील, कै. दत्तोबा सुबराव चौगले, कै. यशवंत तुकाराम निगडे व इतर पंचकमिटी मार्फत गावाचा एकमुखी कारभार पाहिला जात होता. जातीय आरक्षण नसताना देखिल सन १९८८ -८९ साली इतरमागासवर्गीय समाजातील श्री. बालासो शामराव वलकुंजे यांची बिनविरोध निवड झाली होती. सन १९९७ साली पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान सौ. लैलाताई अन्नाप्पा चव्हाण याना मिळाला होता.